Book - al - war » Authors
Book - al - war » Authors
’भा. रा.’ वलेलं बालपण
माझ्या आजोबांमुळे मी खूप लहानपणीच ‘वाचता’ झालो. ‘तांबू गाय’, ‘छान छान गोष्टी’ वगैरेचं वय संपलं आणि आजोबांनी मला पुस्तकांचं कपाट उघडून दिलं. पिवळ्या पडलेल्या, जीर्ण-शीर्ण पुस्तकांनी ते खच्चून भरलेलं होतं. त्यावर “चि. जयंतास, माधवकाकांकडून” किंवा “कु. दिनेश दिगंबर पानसे, चौथी अ” असे शिरोलेखनही होते. हाताला लागलं ते पुस्तक उचललं आणि सरळ नाकाला लावलं. दोन-चार पानांतच पुस्तकात हरवून गेलो. असलं काही कधी वाचलंच नव्हतं. ‘इंद्रजित’, ‘प्रतापराव’ आणि ‘वाचस्पतीं’च्या मागे, ‘लुब्धका’त बसून हिंडता हिंडता तहान-भूक हरपली. पुस्तकाचं नाव होतं “चंद्रावर स्वारी”. मूळ लेखक: ज्यूल व्हर्न, अनुवाद: भा. रा. भागवत, किंमत: दोन रुपये, प्रकाशक: लाखाणी बुक डेपो, गिरगांव, मुंबई – ४.
’चंद्रावर स्वारी’ चे मुखपृ्ष्ठ 
लहानपण मोठं विलक्षण असतं. आपल्या कल्पनाशक्तीला आपल्या आवाक्याच्या मर्यादाही असतात, याची समज आलेली नसते. ‘अंथरूण पाहून पाय पसरावेत’ हे व्यावहारिक सत्य आकळलेलं नसतं. कल्पनाशक्तीला बंध नसतात. तिला भरा~या घ्यायला लहानपणीच शिकवायचं असतं. भा रां ची पुस्तकं नेमकं हेच करतात. मग ती अनुवादित असोत, नाहीतर स्वतः लिहिलेली.
“मराठी बाल-कुमार साहित्यातलं भा. रा. भागवतांचं स्थान” वगैरे साहित्य-संमेलनछाप चर्चा करण्याची माझी योग्यता नाही. माझ्या वाचनप्रवासात पहिलं स्टेशन भा रांचं लागलं. वाचनप्रवास पुढे चालू राहिला, गाडी देशांतरालाही गेली. पण पहिल्या स्टेशनच्या आठवणी अजून ताज्या आहेत. परवाची गोष्ट. काही कामासाठी मुंबईच्या फोर्ट भागात हिंडत होतो. अचानक ‘शेरे पंजाब’ हॉटेल दिसलं. दुपारची वेळ. सणकून भूक लागलेली. पण मनात पहिला विचार कोणता आला असेल? “अरे! याच हॉटेलात बिपिन बुकलवारने आपल्या टॅक्सी ड्रायव्हर मित्राला घेऊन ‘पुख्खा झोडला’ होता!’ (संदर्भ: दुर्मिळ तिकिटाची साहसयात्रा)
विनीतने आणि मी जेव्हा ‘पुस्तकं’ या विषयाला वाहिलेला ब्लॉग लिहायचं ठरवलं, तेव्हाच ठरवलं, की पहिलं ब्लॉग-पोस्ट भा. रां वर लिहायचं. मी आणि विनीत शाळूसोबती. हो भयंकर हुषार, मी साधारण. पण ‘पुस्तकं’ हा आम्हाला जोडणारा समान धागा. आणि भा. रा. आमचं पहिलं दैवत. (म्हणूनच ब्लॉगचं नावही ‘आमचिया जातीच्या’ बिपिनवरून  ठेवलंय – बुकलवार!)
भा. रा. आज हयात नाहीत. ते असतील तिथे असोत, पण आमच्यासारख्या नातवंडांच्या मनाचा कोपरा त्यांनी कायमचा अडवलेला आहे. त्या दृष्टीने ते अमर आहेत!
आदित्य जयंत पानसे
Posted in Authors       
			<media:title type="html">’चंद्रावर स्वारी’ चे मुखपृ्ष्ठ </media:title>